हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची अनेक कारणे असू शकतात.पण त्यावर उपाय ही आहेत.
थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे त्वचेला ओलावा मिळत नाही. कोरड्या त्वचेसाठी तज्ज्ञांना विचारून तुम्ही तुमच्या त्वचेनुसार क्रीम लावायला हवे.
हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. म्हणून हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करायला हवी.
थंडीच्या वातावरणात लोक कमी पाणी पितात. त्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते.थंडीच्या वातावरणात देखील जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे.
व्हिटॅमिन ए, सी, डी ,ई च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी दररोज मॉइश्चरायझर लावावे.
हिवाळ्यात जर तुम्ही चुकीच्या साबणाचा वापर केला तर तुमची त्वचा कोरडी पडू शकते म्हणून तुमच्या त्वचेला सूट होईल अश्या साबणाचा वापर करावा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)