आपल्यापैकी अनेकांना जेवताना अन्न पदार्थांवर वरुन मीठ टाकण्याची सवय असते. बरेच लोक अशाप्रकारे वरुन मीठ टाकून जेवण्यास प्राधान्य देतात.
मात्र अशाप्रकारे जास्त मीठ खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं याची फार कमी लोकांना कल्पना असते.
तुम्हाला गरजेपेक्षा जास्त मीठ खाण्याची 5 लक्षणं माहितीयेत का? बरं ही लक्षणं शरीरामध्ये सहज दिसून येतात. ती कोणती ते पाहूयात...
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तबाद अचानक वाढू शकतो.
वारंवार लघवीला लागणं हे सुद्धा अधिक मीठ सेवन करत असल्याचा संकेत आहे.
सतत डोकेदुखीची समस्या जाणवत असेल तर त्यामागील कारण मीठाचं अतिरिक्त सेवन हे असू शकतं.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीर फुगतं आणि बोटांना सूज आल्यासारखं होतं.
अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने जास्त तहान लागते. त्यामुळे वारंवार पाणी प्यावं लागतं.
गरज नसतानाही केवळ सवय म्हणून अन्नपदार्थांवर वरुन अतिरिक्त मीठ टाकत असाल तर वेळीच सावध व्हा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)