तुम्हीसुद्धा कलिंगड फ्रीजमध्ये ठेवता का? जाणून घ्या दुष्परिणाम

Apr 10,2024


तुम्हाला माहित आहे का? कापलेले कलिंगड आणि टरबूज फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी होऊ शकतात आणि त्याचा आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात?


कलिंगड काही लोक धुतात आणि कापून थेट फ्रीजमध्ये ठेवतात. असे केल्याने चवीवर परिणाम होतो हे अनेकांना माहीत नसते. याशिवाय कापलेले कलिंगड फ्रीजमध्ये ठेवणेही टाळावे.


कलिंगडामध्ये लाइकोपीन, सिट्रुलीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यांसारखे पौष्टिक घटक असतात. फ्रीजमध्ये ठेवल्याने हे सर्व पोषक तत्व नष्ट होतात.


कापलेले कलिंगड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. कापलेले कलिंगड फ्रीजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरिया तयार होऊ लागतात.


कलिंगड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण त्याची साल खूप जाड असते, ज्यामुळे ते सहजपणे खराब होत नाही. तुम्ही वरच 15 ते 20 दिवस न कापता तसेच ठेवू शकता.


कलिंगड फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी ते 2 तास पाण्यात बुडवून ठेवावे, त्यानंतर ते ताजे कापून खावे. टरबूज थंड करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. असे केल्याने त्यातील पोषक तत्वही संपत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story