शरीरातील पाण्याची कमतरतेमुळे शारीरिक समस्या निर्माण होतात त्याचप्रमाणे याचा मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा वाढतो.
डिहायड्रेशनमुळे सतत थकवा , डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवतो.
शरीरात पाण्याची कमरता निर्माण झाल्यास नकारात्मक विचारांची गती वाढते.
मानसिक आरोग्यासाठी मेडीटेशन व्यतिरीक्त शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते.
डिहायड्रेशनमुळे मेंदूशी संबंधीत आजार बळावतात, त्यामुळे अतिरिक्त मानसिक तणाव जाणवतो.
सतत नैराश्यात असणं, आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण नसणं ही डिहायड्रेशनची लक्षणं मानली जातात.
अतिविचार करून मेंदू थकतो त्यामुळे सतत आळस येणं आणि त्वचा रुक्ष पडणं ही समस्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होते.
डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी आहारात भाज्यांचं सूप, संत्री,कलिंगड, आणि डाळींब यांसारख्या फळांचा समावेश करावा. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)