तुम्हाला भटकंतीची आवड आहे आणि इयर एण्ड आधी परदेश दौरा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा देश फारच उत्तम पर्याय ठरु शकतो.
हा देश आपल्या मुंबईपासून अवघ्या पाच तासांवर असून इथलं वैशिष्ट्यं म्हणजे येथील चलन हे भारताच्या तुलनेत फारच कमकुवत आहे. म्हणजेच इथे स्वस्तात छान ट्रीप प्लॅन करता येईल.
आपण ज्या देशाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे व्हिएतनाम!
समुद्रातील बेटवजा देशांपैकी एक असलेला व्हिएतनाम हा निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने आणि ऐतिहासिक दृष्ट्या फारच सुंदर देश आहे.
भारतीय रुपयाच्या तुलनेत व्हिएतनामी डोंगची किंमत फारच कमी असल्याने हा देश भटकंतीसाठी भारतीयांना परवडणार आहे.
व्हिएतनामी डोंग हे येथील चलन आहे. भारतातील 1 रुपया दिला तर 300 व्हिएतनामी डोंग मिळतात.
हनोई, हो ची मिन्ह सिटी याचबरोबर व्हिएतनाममध्ये अनेक ठिकाणं पर्यटनासाठी फारच उत्तम आहेत.
व्हिएतनाममधील खाद्यसंस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि समुद्रातील सुंदर बेटं पर्यटकांना आकर्षित करतात.
या देशाचा दौरा करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही आताच विचार करु शकता.