भेंडीची भाजी खूप जण आवडीने खातात. पण भाजी करताना ती खूप चिकट होते.
भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी काही टिप्स आजपासूनच फॉलो करा.
भेंडी धुतल्यानंतर ती लगेच कापू नका एका सुक्या कपड्याने पुसून सुकल्यानंतरच कापा.
भेंडीत पाणी मिसळल्याने भाजी जास्त चिकट होते.
भेंडीच्या भाजीत लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाका. त्यामुळं भेंडीची भाजी मोकळी होईल.
लिंबात असलेल्या अॅसिडिक गुणधर्मामुळं भेंडीचा चिकटपणा दूर होतो
या मुळं भेंडीच्या भाजीतील चिकटपणा कमी होतो आणि भाजी क्रिस्पी होते.