यशस्वी व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं पण कसं व्हावं हे कळत नाही. जगातील प्रसिद्ध व्यक्ती या फक्त त्यांच्या मेहनतीनेच नाही तर, त्यांच्या नम्र स्वभावामुळे सगळ्यांची मनं जिंकतात.
भारताला महान आणि कुशल अशा ऋषिमुनी आणि पंडितांचा वारसा लाभलेला आहे.
पंडितच नाही तर गणितज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य हे गणितातले कुशल व्यक्तिमत्त्व होतं.
पंडित आणि गणिततज्ज्ञ असण्याबरोबरच चााणक्य यांनी त्या काळात मांडलेले विचार आजही लागू पडतात.
चाणक्यनी यशस्वी जीवनाचे काही कानमंत्र सांगितले आहेत.
चाणक्य म्हणतात की, दया, प्रेम याप्रमाणेच स्वार्थ आणि धूर्तपणा हे देखील मानवी स्वभावाचे भाग आहेत. त्यामुळे आपली हळवी बाजू कधीही जगाला दाखवू नका. लोक तुमचा गैरफायदा घेतील.
कोणत्याही व्यक्तीला जवळ करण्याआधी त्यांना ओळखायला शिका, असं चाणक्य सांगतात.
इतरांनी आपली किंमत ठरवण्याआधी आपण आपली किंमत करावी. चाणक्य म्हणतात की, जिथे अपल्याला किंमत नाही तिथे राहण्यात अर्थ नाही.
चाणक्य असंही म्हणतात की, युद्ध करुनच पाहिजे ते मिळवता येतं असं नाही. काहीवेळेस तुमच्या मधूर वाणीमुळे देखील तुम्ही इतरांना तुमचं म्हणणं चांगल्या अर्थी पटवून देऊ शकता.
यशस्वी होण्यासाठी तुमच्या अंगी संयम आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे.