तुम्हालाही कॅलशियमची समस्या असेल तर डॉक्टर दीपिका राणा यांनी दिल्याप्रमाणे हे पदार्थ तुम्ही खाल्ले तर नक्कीच फायदा होईल.
एक संत्रीत जवळपास 55 मिलिग्रॅम कॅल्शियम असतं. जे तुमच्या हाडांना खूप ताकद देऊ शकतात.
अंजीरमध्ये पोटॅशियमसोबतच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. रोज 40 ग्रॅम अंजीर खाल्ल्यानं 5 टक्के कॅल्शियम मिळतं. त्यानं हाडांना ताकद मिळते.
चिया सीड्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. 100 ग्रॅम चिया सीड्समध्ये 631 मिलिग्रॅम कॅल्शियम मिळतं.
केलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यात व्हिटामिन सी, व्हिटामीन K आणि एन्टीऑक्सिडंट्स देखील असतात.
1 ते 2 कप टोफूमध्ये 250 ते 800 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. त्याशिवाय फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)