पावसाच्या या दिवसांमध्ये गरम चहाचा एक प्याला आणि सोबतीला गरमागरम चमचमीत भजी... म्हणजे अनेकांसाठी ब्रह्मानंदी टाळीच!
खुसखुशीत, चवदार आणि वाफाळती भजी समोर आली की भल्याभल्यांच्या भुकेला आवर राहत नाही.
कांदा, पालक, बटाटा, मेथी, मूगडाळ या आणि अशा अनेक प्रकारे ही भजी तयार केली जाते. तिचे आकार आणि चवीसुद्धा तितकीच वेगळी आणि कमाल.
सर्वांच्या आवडीच्या अशा या भजीला हिंदीमध्ये पकोडा असंही म्हटलं जातं. पण, तिला इंग्रजीत काय म्हणातात माहितीये?
सहसा कुठंही गेलं असता किंवा अगदी पंचतारांकित हॉटेलांमध्येही भजीचा उल्लेख 'भजी' किंवा 'पकोडा' असाच केला जातो.
भजीला इंग्रजीत फ्रिटर्स असं म्हणतात. पाश्चिमात्य देशांमध्ये हे फ्रिटर्स अर्थात त्यांची भजी ही तुलनेनं कमी चमचमीत आणि मसालेदार असते. पण, तिथंही हा खाद्यप्रकार तितकाच लोकप्रिय.