पावसाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे फायदे माहितीयेत का?

Aug 26,2024


पावसाळा ऋतूमध्ये धरती निसर्ग सौंदर्याने नटते, आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं. परंतु पावसाळ्यात घाणीचं साम्राज्य वाढल्याने रोगराई सुद्धा जास्त पसरते.


तेव्हा पावसाळ्यात हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.


हळद ही औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. तेव्हा हळद टाकून दुधाचे सेवन केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या फ्लूच्या आजारांपासून आराम मिळतो.


हळदमध्ये करक्यूमिन आणि फ्लॅवेनॉइड्स असतात. तसेच रात्रीच्यावेळी हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन दूर होण्यास मदत होते.


हळदीचं दूध हे अँटी बायोटिक म्हणून काम करत. त्यात अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असतात. त्यामुळे ताप, सर्दी यांसारख्या आजारांवर सुद्धा हळदीचं दूध प्रभावी ठरू शकतं.


हळदीचं दूध हे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या व्हायरल आजारांपासून बचाव होतो. हळदीचं दूध कार्डियोवॅस्कुलर हेल्दला सुधारण्यासाठी लाभदायक मानले जाते.


हळदीचं दूध हे श्वसनाशी संबंधित आजारांमधेही आराम देणारे ठरते. गरम कोमट हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने लँग रक्तसंचय, सायनस, दमा आणि ब्राँकायटिस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story