हिंदूधर्मामध्ये वडाच्या झाडाचे अधिक महत्व आहे. ज्येष्ठ महिन्यात साजरी केली जाणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
वडाच्या झाडाला भारताचे राष्ट्रीय वृक्ष म्हणूनही ओळखले जाते. पण तुम्हाला वडाच्या झाडाचे हे बहुगणी फायदे माहित आहेत का?
वडाचे झाड दिवसातून 20तास ऑक्सिजन देते.
सांधेदुखी, दातदुखी, संधीवात आणि तळपायांच्या भेगांवर वडाच्या झाडाचा चिक लावल्यास फायदेशीर ठरते.
वडाच्या झाडाचे साल काढून त्याचा काढा प्यायल्यास मधुमेहाच्या रूग्णांसाठी उपयुक्त ठरते.
सांधेदुखी किंवा पाय मुरगळला असल्यास वडाची पाने गरम करून वेदनेच्या जागी लावल्यास आराम मिळतो.
पावसाळ्यात जर पायाला खाज किंवा चिखल्या झाल्या असतील तर वडाचे चिक लावावे.
ताप, अतिसार आणि पोटदुखीची समस्या होत असल्यास वडाच्या कोवळ्या पारंब्यांच्या रसाचे सेवन करावे.
वडाच्या पारंब्या खोबरेल तेलामध्ये भिजवून ठेवून ते केसांना लावल्यास केसगळतीची समस्या दूर होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)