दिवाळी हा दिव्यांचा सण असून देशभरात हा सण धामधुमीत साजरा केला जातो.
तेव्हा दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याबाबत जाणून घेऊयात.
मेष राशिच्या महिलांनी दिवाळीच्या निमित्ताने लाल रंगाचे कपडे घालावेत. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन. घरात सुख आणि समृद्धि येईल.
वृषभ राशिच्या महिलांनी दिवाळीच्या निमित्ताने निळ्या रंगाचे कपडे घालावेत. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात धन लाभ आणि समृद्धी येते.
मिथुन राशिच्या लोकांनी दिवाळीच्या निमित्ताने नारंगी रंगाचे कपडे घालावेत यामुळे धन आकर्षित होते असे म्हणतात.
कर्क राशीच्या लोकांनी दिवाळीच्या निमित्ताने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास सणाच्या दिवशी ते शुभ मानले जाते.
सिंह राशीच्या लोकांनी दिवाळीत ब्राऊन रंगाचे कपडे घालावेत. हा रंग सिंह राशीच्या लोकांसाठी दिवाळीच्या निमित्ताने शुभ मानला जातो.
दिवाळीत आर्थिक लाभ हवा असेल तर कन्या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावेत. तुम्ही पांढरा रंग आणि इतर रंग असे कॉम्बिनेशन असलेले कपडे घालू शकता.
जीवनात जर तुम्हाला समृद्धी हवी असेल आर्थिक लाभ हवा असेल तर तूळ राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावेत.
वृश्चिकच्या लोकांनी दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनासाठी मरूण रंगाचे कपडे घालावेत. हा रंग या राशीसाठी शुभ मानला जातो.
धनु राशीच्या लोकांनी दिवाळीच्या निमित्ताने जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत, असे कपडे घालणं शुभ मानलं जातं.
मकर राशीच्या लोकांनी दिवाळीच्या निमित्ताने निळ्या रंगाचे कपडे घालावेत यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल.
कुंभ राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे घालावेत. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील.
मीन राशीच्या लोकांनी गुलाबी रंगाचे कपडे घालावेत. यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)