ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ड्राय फ्रूट्सचा समावेश करायला हवा.
बदाम आणि काजू या ड्राय फ्रूट्समुळे आपल्याला ताकद मिळते.
ड्राय फ्रूट्सचे खास लाडू करूनही तुम्ही त्याचे सेवन करू शकता.
पण तुम्हाला माहिती आहे का? बदाम आणि मनुकांपेक्षाही अंजीर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
अंजीरमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न आणि कॉपर सारखे अनेक पोषक तत्त्व असतात.
अंजीर खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
अंजीर खाल्याने हाडे मजबूत होतात. कारण त्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नीशियम असते.
अंजीरमध्ये पोटॅशियम आणि फायबर सारखे पोषक घटक असल्याने ते हृदयासाठी फायदेशीर आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)