आनंद महिंद्रांना लागलं 'या' गोष्टीचं व्यसन! स्वत: शेअर केला फोटो

सोशल मीडियावर फारच सक्रीय

महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फारच सक्रीय आहेत.

अनेक गोष्टी करतात शेअर

अनेकदा आनंद महिंद्रा मनोरंजक फॅक्ट्सबरोबरच आपल्या मनातील भावना सोशल मीडियावरुन व्यक्त करतात. अगदी क्रिकेटपासून सिनेमापर्यंत आणि देशात घडणाऱ्या घडामोडींपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्रातील अपडेट्सबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला आनंद महिंद्रांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सहज पाहायला मिळतात.

खासगी आयुष्याबद्दलही भाष्य

टेक सेव्ही उद्योजक असलेले आनंद महिंद्र आपल्या खासगी जीवनामधील अनेक गोष्टी त्या सोशल मीडियावरुन शेअर करतात. नुकतीच त्यांनी अशीच एक पोस्ट केली आहे.

व्यसन लागल्याची कबुली

आपल्याला एक व्यसन लागलं आहे अशी कबुली आनंद महिंद्रांनी दिली आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे.

महिंद्रांनी शेअर केला हा फोटो

आनंद महिंद्रांनी त्यांच्या टेबलवरील मखान्याने भरलेल्या वाटीचा फोटो पोस्ट केला आहे.

ती पोस्ट नेमकी कसली?

मखान्याची मागणी वाढत असल्याची पोस्ट शेअर करताना आनंद महिंद्रांनी आपल्यालाही याचं व्यसन लागल्याचं म्हटलं आहे.

नेमकं पोस्टमध्ये काय?

"मला याचं (मखान्याचं) व्यसन लागलं आहे. चहाच्या वेळी कायम (मखाना) माझ्या टेस्कवर असतो," असं आनंद महिंद्रा म्हणालेत.

मखाना एवढा आरोग्यादायी का?

मखान्याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं याचं प्रमुख कारण म्हणजे मखाना प्रोटिनयुक्त आणि ग्लूटेन फ्री असतो.

मखन्यामध्ये काय काय असतं?

मखन्यामध्ये खनिजे, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात असतात.

हे व्यसन नक्कीच आरोग्यदायी

मखन्याचे फायदे पाहिले असता आनंद महिंद्रांना लागलेलं हे व्यसन नक्कीच आरोग्यदायी आहे, असं म्हणता येईल.

VIEW ALL

Read Next Story