दारु व्हेज असल्याचा दावा सगळेच जण करतात. पणस खरचं दारु व्हेज आहे की नॉनव्हेज याचं उत्तर आश्चर्यचकित करणारे आहे.
दारु पिणे शरीरासाठी हानीकरक आहे. यामुळेच दारु पिऊ नये असा सल्ला दिला जातो.
बियर, वाईन, व्होडका, व्हिस्की, रम असे दारुचे विविध प्रकार आहेत.
दारु प्रामुख्याने फळ तसेच धान्य यापासून बनवली जाते.
फळ आणि धान्यापासून बनत असल्याने दारु व्हेज असल्याचा दावा केला जातो.
प्रोसेसिंग दरम्यान बियर फिल्टर करण्यासाठी इजिनग्लास नावाच्या पदार्थाचा वापर केला जातो. इजिनग्लास हे माशाच्या मूत्राशयातून मिळते.
बियरती बॉटल उघडल्यावर त्यातून फेस निघतो. फेस येण्यासाठी पेप्सीनचा वापर केला जातो. जे अंड्याच्या पांढऱ्या भागापासून तयार केले जाते.
दारुमध्ये कोणते घटक वापरण्यात आलेत याची माहिती संबधीत बॉटलवर लिहीलेली असते.