सर्वात आधी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दारू सोडा. सुटत नसेल तर काय?
असे काही पदार्थ आहेत जे दारु पिण्याआधी खाल्ल्यास यामुळे लिव्हर खराब होणार नाही.
केळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. केळी रक्तप्रवाहात अल्कोहोलचे शोषण कमी करण्यास मदत करतात.
अल्कोहोल पिण्याआधी अंडी खाल्ल्यास लिव्हरवर याचा जास्त परिणाम होत नाही.
दारुचे सेवन करण्याआधी दह्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात अल्कोहोलचे शोषण कमी प्रमाणात होते.
दारु पिण्याआधी संत्री, सफरचंद यासारख्या फळांसह गाजर, रताळे याचे सवेन करणे देकील फायदेशीर ठरते.
दारु पिण्याआधी पोटभर भाजी चपाती खावी यामुळे लिव्हरचे कमी प्रमाणात नुकसान होते.
अल्कोहोलचे सेवन हे शरीरासाठी अत्यंत हानीकारक आहे. यामुळे दारुचे सेवन टाळावे.