विमानातून प्रवास करणे हे आपल्यातील अनेकांचे स्वप्न असते.
तुम्ही जर येत्या काही दिवसात किंवा महिन्यात पहिल्यांदाच विमान प्रवास करणार असाल तर या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरु शकतात.
जर तुम्ही विमानातून प्रवास करणार असला तर कमीत कमी किंवा आवश्यक तितकेच सामान घेऊन जा.
विमान प्रवासावेळी एक ठराविक वजनापर्यंत सामान सोबत न्यावे लागते. जर तुमचे सामान अधिक असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतात.
विमान प्रवासावेळी त्याच्या तिकीटाचे प्रिंट काढा.
तुमच्या फ्लाईटच्या दोन तासांपूर्वी आधी विमानतळावर पोहोचा.
तुमच्या फ्लाईटचा नंबर आणि त्याच्याशी संबंधित घोषणांवर आवर्जुन लक्ष द्या.
विमानात प्रवेश केल्यावर एअर हॉस्टेसकडून तुमची सीट कुठे आहे, याची चौकशी करा आणि आरामात प्रवास करा.