कैरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
कैरी खाल्यानं आपलं शरीर हे थंड होतं आणि ऊन्हाचा त्रास होत नाही.
कैरीत पोटॅशियम आणि मॅगनेशियम मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे ब्लड सर्क्युलेट होण्यास मदत होते.
कैरीत व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे तुमची त्वचा देखील ग्लोइंग होते. त्यासोबत सुरकुत्या देखील दूर होतात.
कैरीत कॅल्शियम आणि फॉस्फरससारखी अनेक तत्व असतात त्यामुळे हाडं मजबूत होतात.
व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते.
कैरी खाल्यानं शरिर हायड्रेटेड राहतं आणि उष्माघात होण्याची शक्यता कमी होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)