मखाना हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
मखानामध्ये प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात.
मखानामध्ये फायबर असल्यामुळे यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
मखानामधील फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे आपले हृदय निरोगी राहतं.
मखानामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असल्याने मधुमेह रुग्णांना मखाने खाण्याचा सल्ला दिला जातो.
मखानाचे सेवन दररोज केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत मिळते.
मखाना खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढण्यास मदत मिळते. शिवाय शुक्राणूंची संख्या वाढते. म्हणून पुरुषांनी मखाने खाल्ले पाहिजे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)