फक्त सकाळी दिसतात Vitamin B12 च्या कमतरतेची 5 लक्षण, दुर्लक्ष करू नका

Pooja Pawar
Nov 14,2024


मानवी शरीरासाठी जवळपास प्रत्येक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. यापैकीच Vitamin B12 हे महत्वाचे व्हिटॅमिन आहे.


शरीरात Vitamin B12 ची कमतरता तेव्हाच जाणवते जेव्हा तुम्ही घेत असलेल्या आहारातून हे व्हिटॅमिन तुम्हाला पर्याप्त प्रमाणात मिळत नाही.


Vitamin B12 ची कमतरता जाणवू लागल्यास आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. या व्हिटॅमिनची कमतरता जाणवू लागल्यावर शरीरात 5 लक्षण जाणवतात त्याकडे दुर्लक्ष करू नका.

थकवा आणि कमकुवतपणा :

शरीरात Vitamin B12 च्या कमतरतेमुळे, रुग्णांना खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. सकाळी उठल्यावर जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

श्वास घेण्यास त्रास :

सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला श्वास घेण्यास जास्त त्रास होत असेल तर हे Vitamin B12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या व्हिटॅमिनचीच्या कमतरतेमुळे, लाल रक्त पेशी कमी होऊ लागतात, ज्यामुळे ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि श्वास घेण्यात अडचण येते.

जिभेवर सूज किंवा जडपणा :

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे सकाळी उठल्याबरोबर जीभेवर जडपणा आणि सूज येऊ शकते. अशी लक्षण दिसत असल्यास नक्कीच डॉक्टरांची मदत घ्या.

डोकेदुखी किंवा चक्कर येणे :

सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर जर चक्कर येत असेल किंवा तीव्र डोकेदुखीहोत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करा. अशी लक्षण Vitamin B12 च्या कमतरतेची असू शकतात.

उलट्या आणि मळमळ होणे :

सकाळी उठल्यानंतर जर मळमळ आणि उलट्या होत असतील किंवा तसे वाटत असेल तर हे सुद्धा Vitamin B12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story