स्वयंपाकघरात अनेक प्रकाराचे मसाले असतात जे शरीरासाठी पंचामृत ठरतात
5 असे मसाले आहेत जे गंभीर आजारांवर रामबाण ठरू शकतात, जाणून घेऊया.
वजन कमी करण्याबरोबरच अनेक गंभीर आजार दूर ठेवण्यास हे मसाले मदत करतात
मेथी खूप गुणकारी आहे. मेथीच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या दूर होतात. ब्लड शुगर आणि वजनही नियंत्रणात राहते. तसंच, केसांसाठीही फायदेशीर आहे.
बडिशेप शरीरात थंडावा निर्माण करते. त्यामुळं पचनसंस्था चांगली राहते. फायबरने युक्त असलेले बडिशेपमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात
धणे पोटासाठी खूप लाभदायी आहे. यामुळं मेटाबॉलिज्म वेगाने होते. तसंच, लठ्ठपणादेखील कमी होतो
ओवा अॅसिडिटी आणि ब्लॉटिंगची समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. त्यामुळं पचनसंस्था मजबूत होते. लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते
जीरा पचनसंस्था आणि वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळं गॅस ब्लोटिंगची समस्या होत नाही. तसंच लठ्ठपणादेखील कमी होतो
रात्री सर्व पाच मसाले 1-1 चमचा एका काचेच्या बॉटलमध्ये टाका आणि त्यात एक ग्लासभर पाणी टाका. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)