लठ्ठपणामुळं आजच्या काळात अनेकजण ग्रस्त आहेत. वजन वाढण्याचे एक कारण म्हणजे ऑफिसमधील चुका.
ऑफिसमधील या आठ चुकांमुळं तुमचं वजन वाढू शकते. त्यामुळं आत्ताच सावध व्हा.
कामाचे इतके टेन्शन असते की जेवण जेवण्याचीही फुरसत नसते. अशावेळी अनेकदा अनहेल्दी जेवण खाल्लं जातं.
काही जणांवर कामाचं इतकं प्रेशर असते की ते खुर्चीवरुन उठतच नाही. जास्तवेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने वजन वाढते.
कामाच्या नादात लवकर लवकर खाल्लं जात अशावेळी जेवण पचतदेखील नाही. जेवण न पचल्यामुळं शरीरात लठ्ठपणा येतो
ऑफिसमध्ये असल्यावर सुर्याच्या किरणांपासून दूर असतो. यामुळंही लठ्ठपणा वाढत जातो.
जर तुम्हीसुद्धा या चुका करत असतील तर त्या आत्ताच टाळा