काही लोकांना मद्यपान करण्यापेक्षा ऊंची मद्य खरेदी करण्याचा शौक असतो.
काही मद्यांची किंमत इतकी असते की त्यांना विकत घेण्यासाठी बोली लावली जाते.
Macallan 1926 ही जगातली सर्वात महागडी व्हिस्की आहे.
याची किंमत 2.1 मिलिअन पौंड इतकी आहे.
डॉलरमध्ये ही किंमत 2.7 डॉलर इतकी आहे.
भारतीय रुपयांमध्ये 22 कोटी 47 लाख 59 हजार 610 रुपये इतकी या व्हिस्कीची किंमत आहे.
या मद्याच्या फक्त 40 बाटल्या आतापर्यंत तयार केल्या गेल्या आहेत.
1987 मध्ये न्यूयॉर्क शहरात 5 हजार पौंड किमतीत या व्हिस्कीचा लिलाव झाला होता.
त्यानंतर 2019 ला जवळजवळ 13 कोटी 78 लाख रुपयांना हे मद्य विकले गेले.