झी 24 तासवर तुमच्या आमच्या बाप्पाचे दर्शन

घरोघरी बाप्पाचे आगमन झालेले आहे . सजावट करण्यासाठी घरांमधून लोक रात्रीच्या रात्री जागतात. भाविकांनी उभारलेले देखावे आणि घरोघरी विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींचे दर्शन नक्की घ्या.

अनिल शिवराम भारती , जालना

यांच्या घरी गणेशाची बसकी सुबक मूर्ती छानश्या बैलगाडीत बसवलेली आहे.

निधी प्रशांत म्हाळस ,वार्जे पुणे

यांचा बाप्पा सुंदर मखरात बसला आहे.

राधिका संतोष जीरोबे , कर्वेनगर पुणे

यांनी बाप्पाला स्वामींच्या सहवासात छानशा सजावटीत बसवले आहे.

शैलेश कुलकर्णी , संभाजीनगर

यांच्या घरी बाप्पासाठी मराठी संस्कृतीचा देखावा उभा केला आहे . विठ्ठलाच्या दारी पायी चालत जाणारीऱ्या वारकऱ्यांचा समावे श आरासीत आहे.

चंदन रविकर जाधव

बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदीच्या फुलांचा वापर करून जाधव कुटूंबियांनी बाप्पाला त्यात विराजमान केले आहे .

पुष्कर कोळी नवापूर ,नंदूरबार

अयोध्येतील श्री राम मंदिराचा हा देखावा पुठ्ठ्या पासून बनवला आहे.

श्री.दिपक सहदेव सणस, डिलाईल रोड

यांनी निसर्गस्नेही साहित्याचा वापर करून आकर्षक राजमहाल उभारलेला आहे.

सतिश शांताराम गिते ,कल्याण

हसमुख प्रसन्न गोड आणि गुलाबी फेटा, पांढरे धोतर परीधान केलेली बाप्पाची‌ प्रतिमा आहे.

अरूण पाटील वसई

पाटील परीवाराने खुप सुंदर अशी बाप्पाची पिवळ्या धोतरातील मुर्ती घरी आणली आहे.

मीनल भालेराव नाशिक

भालेराव कुटूंबियांनी छानशी शाडूमातीची गणेश मूर्ती सुंदर अशा सजावटीत विस्थापित केली आहे.

VIEW ALL

Read Next Story