नव्या हंगामासाठी सज्ज

धोणीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये तब्बल चारवेळा जेतेपद पटकावलं आहे. पण गेल्या हंगामात चेन्नईचा संघ तळाला होता. आता या हंगामात चेन्नई नव्या उत्साहाने उतरण्यासाठी सज्ज झालीय.

चाहत्यांसमोर जोडले हात

धोणी बॅटिंग प्रॅक्टिसाठी तयार होत होता. याचवेळी स्टेडिअममध्ये धोणीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. चाहते माही-माहीच्या नावाने घोषणा करत होते. यावेळी धोणीने त्यांना हात जोडून नमस्कार केला

धोणीचा हात जोडतानाचा फोटो व्हायरल

सराव शिबिरादरम्यानचा त्याचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत धोणी कोणासमोर तरी हात जोडताना दिसत आहे.

आयपीएलसाठी जोरदार सराव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोणी आता केवळ आयपीएलमध्ये खेळतो. या स्पर्धेसाठी त्याने सराव शिबिरात जोरदार सराव केला.

31 मार्चपासून आयपीएलचा धमाका

आयपीएलमधला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ओपनिंगचा सामना खेळवला जाईल

VIEW ALL

Read Next Story