यॉर्करवर घेतली मेहनत

यॉर्कर कसा टाकावा याचं मार्गदर्शन मलिंगाने संदीपला केलं होतं. तसंच सराव शिबिरात यॉर्करवर मेहनत घेतली होती. त्यामुळे संदीपने यशाचं श्रेय मलिंगा दिलं.

यशामागे मलिंगाचं श्रेय

संदीपच्या यशामागे खरा हात होता तो राजस्थानचा प्रशिक्षक आणि यॉर्कर किंग लसिथ मलिंगाचा. सामना संपल्यानंतर संदीपने याचा खुलासा केला.

धोनी सिक्सपासून मुकला

राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्माच्या हाती चेंडू होता. संदीपने शेवटचा चेंडू यॉर्कर टाकला. पण यावेळी धोणी सिक्स लगावण्यापासून मुकला.

एमएस धोनी स्ट्राईकवर

शेवटच्या चेंडूवर सीएसकेला विजयासाठी गरज होती 5 धावांची आणि स्ट्राईकवर होता जगातील बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोणी.

शेवटच्या षटकापर्यंत चुरस

राजस्थानने चेन्नईसमोर (CSK)विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. सीएसकेला 172 धावा करता आल्या.

राजस्थानची रॉयल कामगिरी

संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थानने पहिल्यांदाच चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवण्याचा विक्रम केला.

आयपीएलमधला थरारक सामना

आयपीएलमध्ये बुधवारी सतरावा सामना खेळवण्यात आला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 3 धावांनी पराभव केला.

VIEW ALL

Read Next Story