आतापर्यंत IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. या पाच गोलंदाजांमध्ये चार भारतीय फिरकी गोलंदाज आहेत, तर केवळ एका विदेशी गोलंगाजाचा समावेश आहे.
हे खेळाडू कोण आहेत आणि त्यांच्या नावावर किती विकेट आहेत ते जाणू घेऊयात...
लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 145 सामन्यांमध्ये 21.69 च्या सरासरीने आणि 16.97 च्या स्ट्राइक रेटने 187 विकेट घेतल्या आहेत. आता राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहे.
ड्वेन ब्राव्हो हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ब्राव्होने IPL च्या 161 सामन्यांमध्ये 23.82 च्या सरासरीने आणि 17.05 च्या स्ट्राइक रेटने 183 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2013 साली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 32 विकेट्स घेतल्या होत्या.
लेगस्पिनर पियुष चावला हा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तो यंदा मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने 181 सामन्यांमध्ये 179 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या सीजनमध्ये त्याने 22 विकेट्स घेतल्या होत्या. याआधी त्याने 2008 च्या पहिल्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी 17 विकेट्स घेतल्या होत्या.
अमित मिश्रा हा IPL मध्ये सर्वाधित विकेट घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. मिश्राने 161 सामन्यांमध्ये 23.87 च्या सरासरीने आणि 19.42 च्या स्ट्राइक रेटने 173 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनराईझर्य हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
रविचंद्रन आश्विन हा या यादीतील एकमेव ऑफस्पिनर आहे. त्याने IPL च्या 197 सामन्यांमध्ये 171 विकेट्स घेतलेल्या आहेत. अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आहे आणि सध्या तो राजस्थान रॉयल्समध्ये आहे. त्याने पंजाब किंग्जचे नेतृत्वही केले होते.