Health Infromation News : महिलांना जास्त वेळ झोप का हवी याची काही कारणे आहेत. मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी झोप शरीरासाठी अत्यंत गरजेची आहे.
Health Infromation News : अभ्यासात असे आढळून आले की पुरुष आणि स्त्रियांचे झोपेचे तास वेगवेगळे आहेत आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाश आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते. तसेच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त झोपतात, असे त्यात म्हटले आहे.
जैविक फरकांमुळे, पुरुष आणि स्त्रियांच्या झोपेच्या गरजा थोड्या वेगळ्या असू शकतात, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. महिलांना पुरुषांपेक्षा सरासरी जास्त झोप लागते. खराब झोपेचे परिणाम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त गंभीर असतात.
अनेक संशोधनानुसार कमी झोप घेतलेल्या किंवा झोपेपासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तणाव आणि मानसिक आरोग्य समस्यांचा धोका जास्त असतो, असे दिसून आले आहे.
काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते. CDC च्या अहवालानुसार, 19-60 वयोगटातील लोकांना किमान 7 तासांची झोप आवश्यक आहे.
महिलांनी पुरुषांपेक्षा 11 ते 13 मिनिटे जास्त झोप घेतली पाहिजे कारण महिलांचा मेंदू अधिक काम करतो आणि तो पूर्ववत होण्यासाठी अधिक झोप लागते.
महिलांनी जास्त वेळ झोपायला हवे असा दावाही अहवालात करण्यात आला आहे, त्यामागे अनेक कारणे आहेत. महिला या घरापासून ऑफिसपर्यंत सर्वकाही सांभाळतात, त्यामुळे त्यांना अधिक झोप आणि विश्रांतीची देखील आवश्यकता असते. जर ती आईची जबाबदारीही सांभाळत असेल तर कामाचा ताण दुप्पट तिप्पट होतो.
मासिक पाळीचे दिवस असोत, गर्भधारणेचे महिने असोत किंवा रजोनिवृत्तीचे वय असो, या तिन्हींमध्ये जितक्या वेगाने हार्मोन्स बदलतात तितक्याच वेदना आणि समस्या वाढत जातात. अशा स्थितीत महिलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडायला लागते, ज्यामध्ये पूर्ण झोप खूप उपयुक्त ठरते.
महिलांचे वजनही पुरुषांपेक्षा वेगाने वाढते आणि अशा स्थितीत त्यांना निद्रानाश होऊ लागतो. लठ्ठपणा आणि निद्रानाश या दोन्हींचा एकमेकांशी संबंध आहे. तसेच सामाजिक दबाव आणि शारीरिक बदलांमुळे महिलांना अधिक चिंता आणि नैराश्याचा सामना करावा लागतो