तुम्हाला माहितीये श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत?
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतीयांच्या सावनाला सुरुवात झाली असून आज त्यांचा पहिला सावन सोमवार आहे.
मराठी लोकांचा श्रावण महिना 18 जुलैपासून सुरु होणार आहे. अमावस्या झाली की श्रावण महिन्याला सुरुवात होईल.
श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे बंद करण्यात येतो. यंदा दोन महिने श्रावण असल्याने मांसाहार करणाऱ्याची परीक्षा आहे.
श्रावणात मांसाहारावर बंदी का असते हे तुम्हाला माहिती आहे का? यामागे शास्त्रीय कारणं आहे.
खरं तर जुन्या परंपेरला धार्मिकआधार तर आहे पण त्यामागे विज्ञान कारणंही जोडलं गेलं आहे.
श्रावणात मांसाहार न करण्यामागे कारण की यावेळी आपली पचन शक्ती मंद झालेली असते. पावसाळात आर्द्रता आणि ओलसरपणा वाढल्यामुळे मांसाहारासारखे पदार्थ पचण्यास जड असतात.
श्रावणात पावसामुळे मांसावरील बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात. अशात जर आपण मांसाहार केल्यास आपल्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
श्रावण महिना हा प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मासे किंवा अन्य नॉनव्हेज पदार्थ खाण्यावर बंदी आणली जाते.
पावसाळ्यात माणसांसोबत प्राण्यांनाही डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार होतात. त्यामुळे याकाळात मांसाहार करणे बंद केलं जातं.