स्टीलच्या भांड्यांना गंज का चढत नाही?
तुम्ही कधी पाहिलंय का, एखादं लोखंडी भांडं त्यामध्ये जेवण झाल्यावर ते धुवून स्वच्छ केलं असतं त्यावर गंज चढतो.
मुळात लोखंडाच्या भांड्यांमध्ये जेवण शिजवण्याचे बरेच फायदे आहेत. हा धातू सर्वाधिक वापरात आणला जाणारा धातू आहे.
एक लक्षात घ्या, लोखंड कधीच शुद्ध स्वरुपात वापरात आणलं जात नाही.
शुद्ध लोखंड अतिशय मृदू असून गरम होताच त्याचा आकार बदलू लागतो. पण, स्टीलच्या बाबतीत तसं होत नाही. कारण, स्टील टणक असतं.
लोखंडाची जड वस्तू, एखादा जाड थरही गंज लागल्यास खराब होतो. स्टीलच्या बाबतीत मात्र असं घडत नाही.
गंज चढू नये यासाठी स्टीलची निर्मिती करताना लोखंडामध्ये निकेल आणि क्रोमियम मिसळलं जातं. याच मिश्रणाला स्टेनलेस स्टील असं म्हणतात.
स्टेनलेस स्टील कितीही गरम झालं, तापलं तरीही त्याच्यावर उष्णतेचा फारसा फरक पडत नाही. शिवाय स्टीलची भांडी दीर्घकाळासाठी गंज न चढता तुम्ही वापरातही आणू शकता.