असं नेमकं का करतात?

असं नेमकं का करतात? मंदिरात नारळ का फोडतात? यामागचं कारण तुम्हाला ठाऊक आहे का?

Jul 07,2023

जाणून घ्या यामागचं उत्तर

तुम्ही, तुमच्या घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीनंही अनेकदा मंदिरांबाहेर नारळ फोडला असेल. याच्यामागचं कारण तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का?

काय होती प्रथा?

काही वर्षे मागं गेलं असता एक बाब लक्षात येते की त्यावेळी देवदेवतांपुढे प्राणीमात्रांचा बळी दिला जात होता. पण, ही प्रथा समाजातील सर्वांनाच रुचली नाही.

निष्पाप प्राण्यांचा बळी का द्यावा?

देवासाठी निष्पाप प्राण्यांचा बळी का द्यावा? असा प्रश्न विचारत मग या मंडळींनी या रुढीचाच विरोध केला आणि तेव्हापासूनच प्राण्यांचा बळी देण्याऐवजी नारळ फोडण्याची सुरुवात झाली.

मनातील ईर्ष्या दूर करणं

नारळ फोडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे मनातील ईर्ष्या दूर करणं.

प्रतीक

मंदिरात जातेवेळी, थोडक्यात देवापुढे असतेवेळी आपल्या मनातील मोह, मत्सर, ईर्ष्या यांसारखे भाव त्यागत स्वत:ला देवाच्या स्वाधीन करण्याचं प्रतीक म्हणूनही नारळ फोडला जातो.

नकारात्मक प्रवृत्ती

नारळ फोडताना त्यासोबत नकारात्मक प्रवृत्तींचा नाश करून निर्मळ अंत:करणानं आपण प्रपंचात परततो असाही यामागचा एक संदेश आहे.

नारळ फोडताय?

तेव्हा इथून पुढे जेव्हाकेव्हा देवापुढे नारळ फोडत असाल तेव्हा ही कारणं आणि त्यामागे असणाऱ्या समजुती कायम लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा.

पटताहेत का ही कारणं?

कारण, ही रंजक कारणं तितकीच पटण्याजोगी आहेत हे नाकारता येणार नाही.

VIEW ALL

Read Next Story