अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाला तर काय करतात?

Sep 04,2023

60 वर्षात 20 अंतराळवीरांचा मृत्यू

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण, गेल्या 60 वर्षात 20 अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे.

अपोलो लाँच पॅड फायर

नासाच्या 1967 साली झालेल्या अपोलो लाँच पॅड फायरमध्ये 3 आंतराळवीरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

सोयुझ मोहिम

तर 1971 साली सोयुझ मोहिमेत 3 आंतराळवीरांचा मृत्यू झाला होता.

नासा स्पेस शटल

त्यानंतर 1986 ते 2003 दरम्यान नासा स्पेस शटल दुर्घटनांमध्ये तब्बल 14 आंतराळवीरांचा मृत्यू झाला होता.

आंतराळवीराचा मृत्यू

जर अवकाशात किंवा चंद्रावर आंतराळवीराचा मृत्यू झाला तर काय करतात? असा प्रश्न सर्वांना पडला असेल.

प्रोफेसर इमॅन्युएल

द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉप स्पेश हेल्थचे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी याविषयी माहिती दिली.

आंतराळात मृत्यू झाला तर...

आंतराळात मृत्यू झाला असेल, तर काही तासांतच त्याचा मृतदेह कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत पाठवता येतो, असं इमॅन्युएल म्हणतात.

मृत्यू चंद्रावर झाला असेल तर...

जर मृत्यू चंद्रावर झाला असेल तर अंतराळवीर काही दिवसांत मृतदेह घेऊन येऊ शकतात. त्यासाठी घाई केली जात नाही. त्यासाठी विविध प्रोटोकॉल तयार केले आहेत, असं इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी म्हटलंय.

VIEW ALL

Read Next Story