14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. चांद्रयान 3 चा आता चंद्राच्या कक्षेत प्रवास सुरु झाला आहे.
चंद्रावर माणूस पाठवण्याच्या अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या मोहिमेला मदत होणार आहे.
या मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या पाण्याचं नेमकं स्वरुप समजेल.
चंद्रावर भूकंप होतात का याचा अभ्यास लँडर आणि रोवर करणार आहेत.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. तर, अमेरिका, रशिया, चीननंतर भारत चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरेल.
चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यास भारतासह जगासाठी मोठं यश असणार आहे. कारण, आजपर्यंत एकाही देशानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवलेलं नाही.
प्रज्ञान रोवरच्या मदतीनं चंद्रावर वैज्ञानिक परीक्षण केले जाणार आहे.
विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे.
17 ऑगस्ट हा दिवस इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असणार आहे. कारण याच दिवशी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.