'मोदी मॅजिक' संपलं? लीड 50 टक्क्यांहून अधिक घसरलं; एकूण मतांचा आकडा पाहिलात का?

Swapnil Ghangale
Jun 06,2024

लोकसभेची निवडणूक तिसऱ्यांदा जिंकली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून सलग तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.

कमी मताधिक्याची चर्चा

मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या विजयापेक्षा त्यांना मिळालेल्या कमी मताधिक्याची आहे.

सर्वात कमी लीड

आतापर्यंत मोदींनी वाराणसीमधून लढलेल्या सर्व निवडणुकींपैकी सर्वात कमी लीड मोदींना यंदा मिळाला आहे.

पहिल्यांदा किती मताधिक्य?

2014 साली मोदी पहिल्यांदा वाराणसीमधून लढले तेव्हा त्यांनी ही निवडणूक 3 लाख 71 हजार 784 मतांनी जिंकली होती.

2019 मध्ये सर्वात मोठा विजय

2019 मध्ये मोदींनी सर्वाधिक मतं घेत निवडणूक तब्बल 4 लाख 79 हजार 505 मतांनी विजय मिळवला होता.

काही फेऱ्यांमध्ये मोदी मागे पडले होते

यंदा मात्र मोदी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये चक्क अजय राय यांच्यापेक्षा सहा हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर होते. मोदींविरोधातील अजय राय यांना एकूण 4 लाख 60 हजार 457 मतं मिळाली.

मताधिक्य घसरलं

अर्थात नंतर मोदींनी आघाडी घेत निवडणूक सहज जिंकली. मात्र त्यांना मिळालेलं मताधिक्य 2019 च्या तुलनेत 50 टक्क्यांहूनही अधिक घसरलं आहे.

यंदा मोदी किती मतांनी जिंकले?

2024 ची निवडणूक मोदींनी वाराणसीमधून मागील निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या 1 लाख 52 हजार 513 मतांनी जिंकली. त्यांना 6 लाख 12 हजार 970 मतं मिळाली.

मताधिक्यावरुन राऊतांनी उडवली खिल्ली

यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींची खिल्ली उडवत, 'तुमच्यापेक्षा अमित शाहा आणि राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने जिंकलेत,' असं म्हणाले.

VIEW ALL

Read Next Story