या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.

Sep 23,2023


या कार्यक्रमाआधी सचिन तेंडुलकरने काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनीही यावेळी पूजाअर्चा केली.


त्याआधी सचिन तेंडुलकरने सुनील गावसकर, रवी शास्त्री, आणि दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबरचा विमानातला फोटो शेअर केला.


वाराणसीतल्या स्टेडिअमच्या भुमीपूजन सोहळ्याला सचिन तेंडुलकरशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि कपिल देवही उपस्थित होते.


वाराणसीतलं आंतरराष्ट्रीय स्टेडिअम 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता 30 हजार इतकी असून 451 कोटी खर्च येणार आहे.


या स्टेडिअमच्या डिझाईनमध्ये डमरु आणि त्रिशुळाची झलक पाहिला मिळणार आहे. या स्टेडिअममुळे पूर्वांचलच्या जनतेला आंतरराष्ट्रीय सामने पाहिला मिळणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story