मंगळवारी रात्रीपर्यंत तपासणी सुरू राहणार

मंगळवारी रात्रीपर्यंत तपासणी सुरू राहणार असून तपासणीचा आढावा घेऊन निष्कर्ष काढले जातील. तसेच चाचण्यांचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसांत सादर केला जाईल.

मुंबई-गोव्यात पर्यनाटनाला वाढ

मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची आणि आर्थिक वाढ होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

राज्यात सध्या चार वंदे भारत

राज्यात सध्या चार वंदे भारत धावत असून पाचवी वंदे भारत सीएसएमटी ते मडगाव चालवण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे.

फेब्रुवारीत धावली पहिली वंदे भारत

देशातील सर्वात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली.

एक तासाची बचत

'वंदे भारत एक्स्प्रेस'च्या चाचणीत विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा प्रवासात एक तासाची बचत होणार आहे.

तेजस एक्स्प्रेसला 8 तास

या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते.

मुंबई-गोवा प्रवास वेगवान

वंदे भारतचा उल्लेखनीय वेग पाहता भविष्यात मुंबई-गोवा प्रवास अत्यंत वेगवान होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

CSMT वरुन चाचणी

मंगळवारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस CSMT येथून पहाटे 5.53 वाजता निघाली आणि दुपारी 12.50 ला गोव्यात पोहोचली.

CSMT ते मडगाव 7 तासांत

या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने अवघ्या ७ तासांत पार केले.

वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी

मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची नुकतीच चाचणी घेण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story