मुंबईवर सध्या अवकाळी पाऊस कोसळलाय.
दरवर्षी जून महिन्यात येणारा पाऊस आता मे महिन्यात आलाय.
त्यामुळे अवकाळी पाऊस का कोसळतो? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
अवकाळी पावसाचा परिणाम केवळ कृषी क्षेत्रावर होतो. तसेच अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांवरही होतो.
हवामानातील बदलामुळे अप्रत्याशित हवामानाचा परिणाम होऊन अवकाळी पाऊस कोसळतो.
ग्लोबल वॉर्मिंग, कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि मजबूत उपोष्णकटिबंधीय जेट प्रवाह ही अलीकडील अवकाळी पावसाची मुख्य कारणे आहेत.
वातावरणातील अस्थिरतेमुळेही अवकाळी पाऊस होऊ शकतो.
वातावरणाच्या दाबात अचानक बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम पावसाळी नसलेल्या हंगामातही पाऊस पडू शकतो.
जंगलतोड, शहरीकरण आणि प्रदूषण यासारखा मानवी हस्तक्षेप अवकाळी पावसाला कारणीभूत ठरू शकतो.
जंगलतोडीमुळे पाण्याचे चक्र विस्कळीत होते. शहरीकरण आणि प्रदूषण सूक्ष्म हवामानावर परिणाम करते. परिणामी अवकाळी पाऊस कोसळतो.