सोशल मीडियावर सध्या नागपूरच्या Dolly Chaiwala आणि दिल्लीच्या Viral Vada Pav Girl चा जोरदार चर्चा आहे.

दिल्लीची वडा पाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षित आपल्या अनोख्या अंदाजामुळे आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

चंद्रीकाची वडा पावची गाडी पालिकेकडून हटवण्यात आल्यानंतर तीने एक व्हिडिओ बनवला होता. यात तीने रडत आपली व्यथा मांडली होती.

तर नागपूरचा डॉली चायवाला बिल गेट्स यांच्यामुळे चर्चेत आलाय. उद्योगपती बिल गेट्स भारत दौऱ्यावर असताना खास डॉली चायवालाच्या टपरीवर गेले होते.

डॉली चायवाला नुकताच दिल्लीला गेला होता. यावेळी त्याने आवर्जुन चंद्रीका गेरा दीक्षितची भेट घेतली. त्याच्या कामाचं त्याने कौतुक केलं.

डॉली चायवाल्याने वडा पाव गर्लसोबत एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे. या व्हिडिओत डॉली चंद्रीकाचं कौतुक करताना दिसतोय.

डॉली आणि चंद्रीकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत जवळपास दहा लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय.

VIEW ALL

Read Next Story