भारताकडे असलेल्या 8 Deadliest Missiles कोणत्या माहितीये का?

चीन आणि पाकिस्तानलाही धडकी भरेल अशी या सर्व क्षेपणास्त्रांची क्षमता आहे.

अग्नी-V मिसाईल (Agni-V Missile)

‘अग्नि-5’ हे शत्रूच्या उरात धडकी भरवणारं क्षेपणास्त्र आहे. ‘अग्नि-5’ क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करण्यास सक्षम असून तब्बल पाच हजार किलोमीटर पेक्षा अधिक दूरचे लक्ष्य भेदण्याची यामध्ये क्षमता आहे.

पृथ्वी-II मिसाईल (Prithvi II Missile)

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘पृथ्वी 2’ या क्षेपणास्त्राचा पल्ला 350 किलोमीटर इतका आहे. डीआरडीओच्या एकात्म क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत हे तयार करण्यात आलं आहे.

ब्राह्मोस मिसाईल (Brahmos Missile)

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची मे महिन्यामध्येच यशस्वी चाचणी करण्यात आली. नौदलाची युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’वरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 700 किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची रेंज आहे.

अग्नी-IV मिसाईल (Agni-IV Missile)

अग्नी 4 हे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेलं आंतरखंडीय क्षेपणास्र आहे. अग्नी 4 चा पल्ला 4 हजार किलोमीटर आहे. क्षेपणास्राची लांबी 20 मीटर तर वजन 17 टन आहे. पाकिस्तान व चीनमध्ये अवघ्या 20 मिनिटांत पोहोचण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

शॉर्या मिसाईल (Shaurya Missile)

‘शौर्य’ क्षेपणास्त्रामध्ये जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. 700 किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची रेंज आहे.

आकाश मिसाईल (Akash Missile)

आकाश क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू झाल्यानंतर 2015 मध्ये 3 दशकांनंतर लष्करात दाखल करण्यात आली. स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्रांमध्ये 25 किमीच्या टप्प्यात शत्रूची हेलिकॉप्टर्स, विमाने, निर्मनुष्य विमाने पाडण्याची क्षमता आहे.

नाग मिसाईल (Nag Missile)

‘नाग’ हे रणागडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बनवलेलं हे क्षेपणास्त्र चार किलोमीटर रेंज असलेलं असून ते खांद्यावरुन डागता येते. यामुळे चीनचे रणगाडे भारताच्या रेंजमध्ये आले आहेत.

अस्त्र मिसाईल (Astra Missile)

‘अस्त्र’ हे हवेतून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 80 ते 110 किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा भेद घेऊ शकतं. हे क्षेपणास्त्र हवेत 20 किलोमीटरपर्यंतच्या उंचीपर्यंत प्रभावी ठरतं.

VIEW ALL

Read Next Story