आपल्या भारतात विविधतेने नटलेली अनेक शहरे आहेत. प्रत्येत शहराची वेगळी ओळख आहे.
पण या शहरांमध्ये श्रीमंतीच्या बाबतीत कोणती शहरे पुढे आहेत? कधी विचार केलाय का?
हेन्ली आणि पार्टनर्सच्या 2023 मध्ये आलेल्या रिपोर्टमध्ये भारतातील शहरांची आर्थिक स्थिती दर्शवण्यात आली आहे.
या रिपोर्टमध्ये देशातील 5 श्रीमंत शहरांची यादी देण्यात आली आहे.
श्रीमंतीच्या बाबतीत हैदराबाद पाचव्या स्थानी आहे. शिक्षण आणि टुरिझम व्यतिरिक्त येथे आयटी कंपन्यादेखील आहेत.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता चौथ्या स्थानी आहे.
या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी भारताची सिलिकॉन वॅली म्हणून ओळखलं जाणारं बंगळूर शहर आहे.
दुसऱ्या नंबरवर देशाची राजधानी दिल्ली आहे. दिल्लीमध्ये शिक्षण संस्था, उद्योग, पर्यटन आकर्षणाचा विषय आहे.
देशातील सर्वात श्रीमंत शहर दुसरं कोणतं नाही तर मुंबई हेच आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.