मुंशी प्रेमचंद

पुस्तकप्रेमी आहात तर, मुंशी प्रेमचंद यांच्या 'या' 10 कादंबऱ्या वाचाच

Apr 25,2024

प्रतिज्ञा

पारंपरिक विचारसरणीच्या सामाजिक दृष्टीकोनातून प्रेम आणि आदरभावनेवर या कादंबरीतून उजेड टाकण्यात आला आहे.

रंगभूमी

या कादंबरीमध्ये एक अंध याचक सूरदास आणि एका उद्योजकामधील संघर्ष नोंदवण्यात आला आहे.

सेवासदन

ही कादंबरी कुंटणखाण्यातील महिलांची कहाणी आहे. यामध्ये तेथील महिलांचं आयुष्य आणि त्यांच्या जीवनातील अडचणींवर भाष्य करण्यात आलं आहे.

मानसरोवर

ही एक कादंबरी नसून लघुकथांचा संग्रह आहे. मुंशी प्रेमचंद यांच्या कथा सांगण्याच्या कलेचा उत्तम नमुना येथे अनुभवता येतो.

कफन

पत्नीच्या अंत्यविधींसाठी काबाडकष्ट करत पैसे जमवणाऱ्या एका गरिब शेतकऱ्याच्या संघर्षाची कहाणी इथं सांगण्यात आली आहे.

गोदान

ही मुंशी प्रेमचंद यांची एक गाजलेली कादंबरी आहे. यामध्ये ग्रामीण जीवन आणि सावकारी प्रथेतून होणारं शोषण यावर भाष्य करण्यात आलं आहे.

कर्मभूमी

भारताच्या स्वातंत्र आंदोलनादरम्यान झालेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांना या कादंबरीमध्ये अधोरेखित करण्य़ात आलं आहे.

निर्मला

निर्मला नावाच्या तरुणीची कहाणी या कादंबरीत आहे. बालविवाह, जातीयवाद आणि सामाजिक परंपरांवर इथं भाष्य करण्यात आलं आहे.

कायाकल्प

जातव्यवस्था आणि समाजावर त्याचा असणारा गंभीर परिणाम यावर या कादंबरीतून भाष्य करण्यात आलं आहे.

गबन

ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कर्ज प्रक्रियेतील गुंतागुंतीवर या कादंबरीतून भाष्य करण्यत आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story