हा किस्सा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या एनटी रामा राव यांचा आहे.
एन. टी. रामा राव हे तेलगु चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपला तेलगु देसम पक्ष स्थापन करत राज्यातील सत्ता काबीज केली.
1983 मध्ये तेलगु देसम पक्षाला बहुतम मिळालं आणि एन. टी. रामा राव सत्तेत आले अन् मुख्यमंत्री झाले.
पंतप्रधान बनण्याची महत्त्वांक्षा असल्याने ते ज्योतिषाच्या सांगण्यानुसार काही गोष्टी करायचे.
ज्योतिषाच्या सांगण्यावरुनच एन. टी. रामा राव रात्री महिलांची वस्त्रं परिधान करु लागले.
एन. टी. आर. यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती.
शाळेतील आपल्या पहिल्याच नाटकात एन. टी. आर. यांनी स्त्री पात्र साकारलं होतं.
एन. टी. आर. हे आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. अनेकजण तर त्यांना देव मानायचे.
जनतेच्या या प्रेमाचा फायदा एन. टी. आर. यांना राजकीय क्षेत्रातही मिळाल्याचं दिसून आलं.
अभिनय क्षेत्रातून राजकारणात येऊन तितकेच यश मिळवणाऱ्या एन. टी. रामा राव यांचा हा सारा प्रवास खरोखरच थक्क करणारा असल्याने त्यांना मानणारा आजही एक मोठा वर्ग दक्षिण भारतात आहे.