कोणताही पदार्थ Deep Fry करताना 100 टक्के मदत करणार 'या' स्मार्ट टीप्स
Deep Fried Food : अशा या पदार्थांच्या गर्दीमध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांना. Deep Fry केलेले पदार्थ आरोग्यास पूरक नाहीत असं कितीही म्हटलं तरीही हे पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.
पदार्थ तळण्यापूर्वी गरजेचं साहित्य, जास्तीच तेल टीपण्यासाठीची जाळी किंवा टिशूपेपर, पदार्थ तळण्यापूर्वी गरजेचं साहित्य, जास्तीच तेल टीपण्यासाठीची जाळी किंवा टिशूपेपर, झारा हाताशी ठेवा.
पदार्थ कमी असेल तर त्यासाठी मोठ्या भांड्याऐवजी लहानशा कढईचा वापर करा यामुळं बरंच तेल वाचतं आणि पदार्थ व्यवस्थित तळला जातो. हे भांडं पूर्णपणे कोरडं असेल याची काळजी घ्या.
ज्या भांड्यात तेल तापत ठेवलं आहे त्याखालची आच मंद ठेवा. तेल तापल्याचा अंदाज घ्या. तेल तापणं म्हणजे ते उकळणं असा अर्थ होत नाही हे कायम लक्षात ठेवा.
पदार्थ तळण्यापूर्वी तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचाच एक लहानसा तुकडा तेलात सोडा. इथं तुकडा तेलात टाकणं नव्हे अलगद सोडणं अपेक्षित आहे.
पुरी, करंजी, भजी किंवा एखादी वडी तेलात तळताना पदार्थ तेलात सोडल्यानंतर त्याच्या आजुबाजूनं येणारे बुडबुडे कमी होण्याची वाट पाहा त्यानंतर त्याची दुसरी बाजू तळून घ्या.
कोणताही पदार्थ तळताना आच मोठी ठेवू नका. अन्यथा पदार्थाच्या बाह्यं आवरणाचा रंग बदलला तरी त्याचा आतला भाग मात्र पूर्णपणे शिजणार नाही.
पदार्थ तळत असताना वारंवार आच कमी, जास्त करु नका. त्यामुळं तेलाचं तापमान बिघडतं, तो व्यवस्थित तळला जात नाही आणि त्याची चवही बिघडून जाते.