तुळशीचे पान रात्रभर तोंडात ठेवून झोपल्यास अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदात याचे महत्व सांगितले आहे.
तुळशीच्या पानामध्ये अॅण्टी बॅक्टेरियल गुण असल्याने व्हायरसशी लढतात. रात्रभर तुळशीचे पान तोंडात ठेवल्यास सर्दी-खोकल्यावर गुण मिळतो.
गॅस, अॅसिडीचा त्रास होत असेल तर रोज तुळशीची 2 पाने तोंडात ठेवून झोपा.
तुळशीच्या पानामध्ये अॅडेप्टेझोन असते. जे स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास मदत करते. नर्व्हस सिस्टिमवरही काम करते आणि मन शांत होते.
डोकेदुखीमुळे झोप येत नसेल तर तुळशीचे पान तोंडात ठेवून झोपा.
तुळशीच्या पानामुळे शरीरात इन्सुलिन हार्मोन बनतात. मधुमेहाच्या रुग्णांना यातून फायदा मिळतो.
तुळशीच्या पानात विटामिन सी असते. यात पॉवरफुल अॅण्टी ऑक्साइड असते.
तोंडातून वास येत असेल तर तुळशीचे पान तोंडात ठेवून झोपा.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)