'या' सोप्या सवयीने 6 महिन्यात बदलेलं तुमचं आयुष्य

आपण आयुष्यात काय बनणार हे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी ठरवतात. त्यामुळे चांगल्या सवयी लावून तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता.

सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. असे केल्यास आरोग्यावरही चांगले परिणाम दिसतील.

उठल्यावर स्वत:चा बेड आवरा. दिवसाची सुरुवात स्वत:ची कामे करण्यापासून करा. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम दिसेल.

झोपेचे वेळापत्रक ठरवा. झोपण्याआधी मोबाईलवर वेळ घालवणं टाळा.

पेंटींग, म्युझिक अशा तुमच्या आवडीच्या गोष्टी शिका. त्यासाठी वेळ काढा.

योगाअभ्यासाचा सराव करा. तुमचे डोके शांत राहून निर्णय घेण्यास यामुळे मदत होईल.

दिवसभर काय घडलं, कोणाला भेटलात, स्पेशल आठवण..सर्वकाही लिहून काढायचा प्रयत्न करा.

रोज किमान 20 मिनिटे चाला. व्यायामासाठी वेळ काढा. यामुळे दिवसभर एनर्जी मिळेल.

फास्ट फूड खाणे टाळा. हेल्दी डाएटची सवय लावून घ्या.

सतत काहीना काही वाचनाची सवय लावून घ्या. तुमच्यात चांगले बदल आपोआप घडतील.

दीर्घ श्वास घेण्याची प्रॅक्टीस करा. श्वास आत घ्या थांबा श्वास सोडा. ही सवय उपयोगी येईल.

VIEW ALL

Read Next Story