भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता

श्रीकांत जिचकर हे भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखले जातात. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे.

श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनुसार, जिचकार यांनी देशातील सर्वात शिकलेला व्यक्ती होण्याचा मान कायम ठेवला आहे.

जिचकार यांनी त्यांच्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकच मिळवला आहे. एवढेच नव्हे तर अनेक सुवर्णपदकेही जिंकली आहेत.

श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते.

पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला.

यानंतर ते आयपीएसदेखील झाले. तसेच पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी चार महिन्यांनी आपले पददेखील सोडले.1980 मध्ये श्रीकांत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाऊल टाकले.

यामुळे ते देशातील सर्वात तरुण खासदार बनले. त्यांनी राज्यमंत्री, राज्यसभा सदस्य आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अशी पदेही भूषवली आहेत.

2 जून 2004 ही त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. या दिवशी श्रीकांत हे त्यांच्या मित्राच्या कारने प्रवास करत होते.

यावेळी त्यांच्या कारला एका बसने धडक दिली. या अपघातात डॉ. जिचकर यांचे वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी निधन झाले.

VIEW ALL

Read Next Story