मृत्यूचा देवता

हिंदू धर्मात यमराजाला मृत्यूचा देवता मानण्यात आलं आहे. मृत्यूनंतर यमराजच आपल्याला नेण्यासाठी येतात असं मानलं जातं.

Jul 04,2023

पाप आणि पुण्याचा हिशोब

मृत्यूनंतर यमराजच त्या व्यक्तीच्या पाप आणि पुण्याचा हिशोब करतात अशी मान्यता आहे.

भारतात आहेत यमराजाची 7 मंदिरं

यमराज यांच्यासह त्यांचे मुनशी चित्रगुप्त असतात. चित्रगुप्ताकडे प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा हिशोब लिहिलेला असतो.

यम मंदिर

हिमाचलच्या चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे हे मंदिर आहे. येथे यमराज चित्रगुप्तासह विराजमान आहेत.

धर्मराज मंदिर

उत्तर प्रदेशातील मथुरात विश्राम घाटाजवळ धर्मराज मंदिर आहे. या मंदिरात यमराज आणि त्यांची बहिण यमुना यांची मूर्ती आहे.

धर्मराज मंदिर, ऋषिकेश

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये हे धर्मराज मंदिर आहे. येथे यमराजाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

श्रीऐमा धर्मराज मंदिर

तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात यमराजाचं मंदिर आहे, ज्याला श्रीऐमा धर्मराज मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. हे मंदिर हजारो वर्षं जुनं आहे.

धर्मराज मंदिर, वाराणसी

धर्मराज यमराजाने वाराणसीच्या धर्मेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकराची पूजा केली होती, त्यानंतर त्यांना यमराजी उपाधी मिळाली असं बोललं जातं.

धर्मराज स्वामी मंदिर

तामिळनाडूच्या थिरुप्पाईन्जिलीच्या त्रिची येथील धर्मराज स्वामी मंदिराला फार मान्यता आहे.

श्री चित्रगुप्त आणि यमराज मंदिर

तामिळनाडूच्या या मंदिरात यमराज आणि चित्रगुप्ताची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story