SBI कडून 30 वर्षांसाठी 35 लाखांचं होमलोन घेतल्यास किती EMI भरावा लागेल?

Aug 30,2024

स्टेट बँक ऑफ इंडिया

आताच्या घडीला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ग्राहकांना 8.50 ते 9.65 टक्के इतक्या व्याजदरानं गृहकर्ज म्हणजेच होमलोन देत आहे.

टॉप अप लोन

टॉप अप लोनवर SBI कडून 8.80 ते 11.30 टक्के इतका व्याजदर आकारला जात आहे.

योनो इंस्टा होम टॉप अप

एसबीआयच्याच योनो इंस्टा होम टॉप अपवर बँक 9.35 टक्के व्याजानं कर्ज देत आहे.

कर्जाचा हफ्ता

8.50 टक्के दरानं एसबीआयकडून 30 वर्षांसाठी 35 लाख रुपयांचं होम लोन घेतल्यास प्रतिमहा 26912 रुपये इतका कर्जाचा हफ्ता भरावा लागेल.

मोठी रक्कम

बँकेकडून घेतलेल्या या कर्जासाठी तुम्ही 30 वर्षांमध्ये तब्बल 61,88,310 रुपये इतकी मोठी रक्कम हफ्त्यांच्या स्वरुपात भरता.

नियम व अटी

कर्ज घेत असताना व्याजदर आणि नियम व अटीसुद्धा वाचल्या जाणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं बँकेकडून फक्त होम लोनच नव्हे तर कोणतंही कर्ज घेताना Terms and Conditions चा मुद्दा लक्षात घ्या.

VIEW ALL

Read Next Story