सुब्रत रॉय यांचे निधन

सहारा इंडियाचे प्रमुख सहश्री सुब्रत रॉय यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर गुंतवणुकीची रक्कम मिळेल की नाही, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे.

रक्कम परत मिळणार

कोट्यवधी गुंतवणूकदारांनी सहारा इंडियामध्ये त्यांचे भांडवल जमा केले आहे. सहारा समूहाच्या चार सहकारी संस्था यासाठी जबाबदार आहेत. तुम्हाला गुंतवलेली रक्कम परत मिळेल की नाही हे जाणून घ्या

गुंतवणूकदारांची रक्कम मिळणार

सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला त्यांचे पैसे व्याजासह गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिले होते.

सहारा रिफंड पोर्टल

या आदेशानंतर केंद्र सरकारने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा रिफंड पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील.

क्लेम ऑनलाईन करा

रिफंडचा दावा फक्त ऑनलाइन केला जाऊ शकतो. याशिवाय ते पूर्णपणे मोफत आहे.

टोल फ्री क्रमांक

गुंतवणूकदाराला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तो टोल फ्री क्रमांकावर (१८०० १०३ ६८९१ / १८०० १०३ ६८९३) संपर्क साधू शकतो.

आतापर्यंत एवढी रक्कम दिली

गेल्या 11 वर्षात सेबीने गुंतवणूकदारांना 138.07 कोटी रुपये परत केले आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम सेबीकडे आहे आणि ती फक्त ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांनाच उपलब्ध असेल.

VIEW ALL

Read Next Story