ट्रेनमध्ये रात्री प्रवास करताना 'हे' नियम पाळा, अन्यथा होईल पश्चाताप

रेल्वेचे नियम

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे नेहमी नियमावली आणत असते. अनेकदा प्रवाशांना या नियमांची माहिती नसते. ज्यामुळे प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो.

रात्री प्रवास करताना कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं याबद्दल जाणून घ्या

जोरात गाणी ऐकू नका

कोणताही प्रवासी आपली सीट, डबा किंवा कोचमध्ये मोबाईलवर जोरजोरात बोलू शकत नाही. तसंच प्रवासी ईअरफोन न लावता जोरजोरात गाणी ऐकू शकत नाही.

रात्री 10 नंतर लाईट बंद

रात्री 10 नंतर कोणत्याही प्रवाशाला लाईट लावण्याची परवानगी नसते. जर प्रवासी नियमाचं उल्लंघन करताना आढळला तर कारवाई केली जाऊ शकते.

मद्यपान, धुम्रपान

याशिवाय ट्रेनच्या डब्यात धुम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे. तसंच ज्वलनशील वस्तू सोबत नेण्यास मनाई असते.

रात्री 10 नंतर टीसी तपासू शकत नाही तिकीट

रात्री 10 नंतर टीटीई प्रवाशांचं तिकीट तपास करण्यासाठी येऊ शकत नाही. पण जर तुमचा प्रवास रात्रीच सुरु होणार असेल तर हा नियम लागू होत नाही.

रात्री 10 नंतर गप्पा नाही

ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी रात्री 10 नंतर गप्पा मारु शकत नाही. तसंच ट्रेनच्या सुविधांमध्ये रात्री 10 नंतर जेवण दिलं जात नाही.

काही झोनमध्ये ट्रेनमध्ये रात्री 11 नंतर वीजेचा पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे यानंतर तुम्ही मोबाईल, लॅपटॉप चार्ज करु शकत नाही.

VIEW ALL

Read Next Story